फ्रेंडशिप डे च्या हार्दिक शुभेच्छा...!
फ्रेंडशिप डे च्या हार्दिक शुभेच्छा...!
माझ्या मनातलं थोडसं च्या सर्व वाचकांना फ्रेंडशिप डे च्या हार्दिक शुभेच्छा...!
मैत्री हे नातं... जे आयुष्याचा एक महत्त्वाचा घटक असतं... विश्वासाच्या अतुट धाग्यांची गुंफण असलेल्या या नात्याबद्द्ल किती आणि काय लिहावं...
जगात अशी एकही व्यक्ती शोधुन सुद्धा सापडणार नाही. ज्या व्यक्तीला एक जवळ्चा मित्र नाही. आपल्या आयुष्यात घडणा-या अनेक चांगल्या वाईट घडामोडींचा साक्षीदार असणारी व्यक्ती म्हणजे मित्र....
काही नाती रक्ताची असतात
म्हणून ती जवळची असतात
जवळची म्हणून ती जपली जातात
जपता जपताच काही आपली होतात
काही जपूनही सोडून जातात
मात्र... काही नाती रक्ताची नसतात
तरीही ती जवळ येतात... आपलीच वाटतात
आणि आपली म्हणूनच ती जपावी लागतात
जे शरिराचं असल्याने जवळचं असतं
ते रक्ताचं नातं...
आणि जे मनापासून असल्यानं आपलं असतं
ते मैत्रीचं नातं...
काहीवेळा रक्ताच्या नात्यात सगळंच दुरावलं जातं
मैत्रीच्या नात्यात मात्र...
उबदार श्वासांनादेखील कधी कधी आपलेपण वाटतं
रक्ताच्या नात्यात विश्वास, जाणीव, आपलेपण नसेलही...
पण... मैत्रीच्या नात्यात मात्र...
आपलेपणाची ऊब... जिव्हाळ्याची ओढ... मनाचा आधार...
सारं काही असतं...
तेच खरं जवळचं असतं...आपलं असतं...
तेच खरं नातं असतं...!
लेखन - गणेश गायकवाड
माझ्या मनातलं थोडसं च्या सर्व वाचकांना पुन्हा एकदा फ्रेंडशिप डे च्या हार्दिक शुभेच्छा...!







0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा