लोड करीत आहे...
नमस्कार मंडळी, मी गणेश गायकवाड या ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत करतो. हा ब्लॉग वाचून आपला अभिप्राय आवश्य नोंदवा.

रविवार 25 जुलै 2010

तुझी आज आठवण झाली ...

तुझी आज आठवण झाली
पाऊसाचे थेंब ओंजळीत घेताना...
अंगावरती शहारे आले
मऊशार दाट धुक्यातून जाताना...
                   डोळ्यासमोर एकच चेहरा
                   प्रत्येक दिवस सरताना...
                   अगदीच हळवा होतो मी
                   तुझ्या आठवणींचं गणित मांडताना...
तुझी आठवण हेच जगणं झालयं...
तुझी आठवण हेच जीवन झालयं
आज खूपच एकटं वाटतयं
गतकाळात डोकावून पाहताना...
                   तु नसल्याचं सत्य मला सलत राहतं
                   मन मात्र आठवणींच्या झोपाळ्यावर झुलत राहतं...
                                              लेखन :- गणेश गायकवाड
                                 

0 टिप्पणी(ण्या):

या ब्लॉगवरील माहितीचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Copyright माझ्या मनातलं थोडंसं... वर जाण्यासाठी