लोड करीत आहे...
नमस्कार मंडळी, मी गणेश गायकवाड या ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत करतो. हा ब्लॉग वाचून आपला अभिप्राय आवश्य नोंदवा.

मंगळवार 16 मार्च 2010

गुढीपाडव्याच्या मन:पुर्वक शुभेच्छा...

            आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, हिंदू कालगणनेनुसार वर्षातला पहिला दिवस. वसंत ऋतुची सुरूवात. हिंदू संस्कृतीतील हा पहिला सण गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा व पाडवा म्हणजे विजयध्वज. ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण केली, प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून याच दिवशी अयोध्येला परतले त्यावेळी नगरातील लोकांनी गुढया-तोरणे उभारून हा दिवस आनंदाने साजरा केला तोच हा आजचा दिवस म्हणजेच "गुढीपाडवा...!"
             गुढीपाडवा हा अत्यंत शुभमुहूर्त मानला जातो. पुराणांमध्ये वर्णन केलेल्या ६० संवत्सरांपैकी प्रत्येक संवत्सराचा वर्षारंभ याच दिवशी केला जातो. शालिवाहन नावाचा राजा होऊन गेला. त्याने शकांचा पराभव केल्याने  हा दिवस विजयदिन म्हणून ओळखला जातो. शालीवाहन राजाच्या या विजयदिनापासून नविन कालगणना सुरू झाली. त्याला "शालीवाहनशक " असे म्हणतात.

             
मराठी नविन वर्षाच्या मन:पुर्वक शुभेच्छा...

0 टिप्पणी(ण्या):

या ब्लॉगवरील माहितीचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Copyright माझ्या मनातलं थोडंसं... वर जाण्यासाठी