सचिन तेंडूलकर - क्रिकेटच्या क्षितिजावरचा एक तेजस्वी तारा
प्रिय सचिन रमेश तेंडूलकर यास....,
सचिन तु क्रिकेटच्या क्षितिजावरचा
एक तेजस्वी तारा आहेस...
प्रतिस्पर्ध्यांचा प्रत्येक डाव उधळून लावणारा
तु सोसाट्याचा वारा आहेस...
तुझ्या हातातली बॅट पाहिली की,
इंद्राच्या हातातील वज्र असल्याचा भास होतो...
तु मारलेला प्रत्येक फटका....
म्हणजे क्रिकेटचा एक नवा इतिहास होतो...
तु म्हणजे देव...
आणि क्रिकेट म्हणजे देवालय आहे....
क्रिकेटमधला 'बादशहा'...
आणि विश्वविक्रमांचा हिमालय आहे.
क्रिकेटप्रेमीच्या जगण्यातला...
तुच निरंतर श्वास आहेस...
विश्वविक्रमांचा शिल्पकार
आणि संघाच्या विजयाचा विश्वास आहेस...
सचिन नावाचं वादळ जेव्हा...
क्रिकेटच्या मैदानात येतं...
प्रतिस्पर्ध्यांच्या मनामधलं...
न सुटलेलं गणित होतं...
गोलंदाजांच्या प्रत्येक अस्राला
तुझ्याकडे प्रतिअस्र आहे...
टीम इंडियाच्या भात्यातील...
तुच सर्वोच्च ब्रम्हास्र आहे...
तु म्हणजे क्रिकेट...
आणि क्रिकेट म्हणजेच तु...
प्रतिस्पर्ध्यांसाठी महत्त्वाची...
विकेट म्हणजेच... तू
तुझं आयुष्यं म्हणजे...
क्रिकेटची अनंत काळची तपश्चर्या आहे...
तुला खेळताना पाहणं...
हीच आमची दिनचर्या आहे...
हे... क्रिकेटविश्वातल्या महामेरू....
हे... विश्वविक्रमांच्या तेजस्वी सूर्या....
हे... क्रिकेट इतिहासातील महापुरूषा....
हे... क्रिकेटच्या रणांगणातील अजिंक्य महावीरा...
तुझ्या किर्तीचा झेंडा असाच फडकत राहो...!
तुझ्या विश्वविक्रमांना अनंत काळचं आयुष्यं लाभो...!
तुझ्या प्रत्येक इनिंगला विनम्र अभिवादन...!
लेखन -: गणेश गंगाधर गायकवाड :-








1 टिप्पणी(ण्या):
sahi lihili aahes mitraa.....
टिप्पणी पोस्ट करा