नाती दोन मनांची नकळत जुळली कधी...?
शब्द...शब्द ऎकता
प्रीत जुळली कधी...?
नाती दोन मनांची
नकळत जुळली कधी...?
रोजचीच भेट ती
नव्हते काहीच नवे
तरीही ओढ तुझी
मज अशीच लागली...
तु जवळ असताना
शब्द मुकेच व्हायचे
अन नसताना तू...
ओढ हलकेच हलायचे..
तुझ्या मनात होता
हाच भाव रंगलेला..
प्रीतीचा मोरपिसारा
मनी असाच फुललेला...
हाक तुझी ऎकता
साद घातली कधी...?
नाती दोन मनांची
नकळत जुळली कधी...?
-: गणेश गायकवाड :-






0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा